Ad will apear here
Next
‘त्यांच्या’ जिद्दीने गाव झाले पाणीदार
गणेश पाकदुने यांनी नांदखेडमध्ये आणले पाणी

नांदखेड : इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर माणूस काहीही करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेश पाकदुने. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील दुष्काळी नांदखेड हे गाव त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे पाणीदार झाले आहे. त्यांनी चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर गावाला पाण्याच्या दुर्भिक्ष्यातून बाहेर काढले आहे. आज त्यांच्यामुळे गावातील दोन तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. 

त्याच्या या जिद्दीला लोकसहभागाबरोबरच पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि अनुलोम संस्था यांची समर्थ साथ लाभली. नांदखेड हे साधारण १६०० लोकसंख्येचे गाव. शेती हाच ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. कमी पर्जन्यमानामुळे गावात दोन तलाव असूनही, कायमच पाण्याचे दुर्भिक्ष्य असे. गुराढोरांनाही पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत असे. अशा या वातावरणाला गावकरीही कंटाळून गेले होते. तीन वर्षापूर्वी गणेश पाकदूने यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील पूर्व आणि पश्चिम बाजूला असणाऱ्या तलावातून गाळ काढण्याचा विचार गावकऱ्यांसमोर मांडला. त्यांच्या विचाराला गावकऱ्यांनी साथ दिली आणि लोकसहभागातून पूर्वेकडे असणाऱ्या तलावातून गाळ काढण्यात आला. त्यानंतर पश्चिमेकडील तलावातील गाळ काढण्यात आला. यासाठी अनुलोम, भारतीय जैन संघटना आणि पाणी फाउंडेशनने त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच जेसीबी व साहित्यही उपलब्ध करुन दिले. 


जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावातील काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने जमीन सुपीक झाली. १०० रुपये ट्रॉली या दराने शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात नेला. साधारण २५०० ट्रिपद्वारे तलावातील गाळ काढण्यात आला. या उपक्रमासाठी अनुलोम, गावातील विठ्ठल नागरी पतसंस्थेने आर्थिक मदत केली. अनुलोम संस्थेने केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे दोन्ही तलाव आज गाळमुक्त झाले आहेत. ४५ बाय ७ मीटर लांबीच्या या तलावात सध्या सहा मीटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गावाची पाणीटंचाई दूर झाली आहे. गणेश यांनी दाखवलेल्या धाडसामुळे गाव आता पाणीदार झाले आहे. गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून, जमिनीतील पाणी पातळीतही वाढ झाली आहे. 

गणेश यांच्या या कामात गावचे सरपंच देविदास म्हैसने, विठ्ठल नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नीळकंठ म्हैसने, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद टिकार यांची साथ लाभली. ‘महान्यूज’वर गणेश पाकदुने यांची यशोगाथा प्रसिद्ध झाली आहे. भगीरथाचा वारसा सार्थ ठरवणाऱ्या गणेश पाकदुने यांचा आदर्श इतर गावातील लोकांनीही घेतला, तर पाणीटंचाई कायमची दूर होईल आणि प्रत्येक गाव पाणीदार होईल. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZWKBV
 Model for others . Local enterprise . Little initial capital investment .
Small scale -- suitable for ' relatively ' small townships . Deserves
More publicity . District boards well placed for the purpose
Similar Posts
कृषी उत्पन्नात कोटीच्या उड्डाणाचा ‘जांब’ गावाचा संकल्प पुणे : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ‘जांब’ या गावाने जलसंधारणाद्वारे शेतीचे पाणी वाढविण्याचा आणि त्याद्वारे गावाचे कृषी उत्पन्न एक कोटी रुपयांनी वाढविण्याचा संकल्प केला आहे.
‘जलयुक्त’च्या पुरस्कारांची घोषणा अमरावती : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यातील पुरस्कारप्राप्त गावे, तालुके, पत्रकारांना आठ नोव्हेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. जलयुक्त
टोळधाडीचा सामना कसा करायचा? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त झालेल्या भारताला आता टोळधाडीच्या संकटाने ग्रासले आहे. करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच आता टोळधाड मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात, विदर्भात आली आहे. टोळधाडीने मोठे नुकसानही केले आहे. या टोळधाडीला कसे निपटायचे, याबद्दल अकोल्याच्या डॉ
अनाथांसाठी विदर्भात फुललेले ‘नंदनवन’ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या, तसेच बेघर, निराधार मुलांना सोबत घेऊन विदर्भात ‘नंदनवन’ फुलवण्याचे काम नंदनवन परिवार करत आहे. वंचित चिमुकल्यांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालण्याबरोबरच त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठीही हा परिवार झटत आहे. ‘लेकरांच्या हक्काचं मोकळं आकाश’ असे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language